¡Sorpréndeme!

Pune Tet Exam News: पुण्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास ED करणार | Sakal Media

2022-07-28 437 Dailymotion

पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची आता 'ईडी' चौकशी करणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही आता केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची आता ईडीने दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना 'ईडी'ने माहिती घेण्यासाठी बोलाविले आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत चौकशी होणार आहे.